पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या

January 13, 2010 10:43 AM0 commentsViews: 39

13 जानेवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी तळेगाव दाभाडे इथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेट्टी यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढली होती. त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते सामाजिक कार्यात होते. गावातला रस्त्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. नजिकच्या काळात लोणावळा इथला रजिस्ट्रेशन ऑफिसमधला सरकारी जमिनीचा गैरव्यवहार, तळेगाव दाभाडे इथला वैशाली मंगल कार्यालयाचा बोगस कारभार त्यांनी बाहेर काढला होता. पोलिसांवर, भ्रष्ट अधिकार्‍यांवर त्यांचा मोठा वचक होता. त्यांना फिटचा त्रास होता तरीही ते काम करत होते. लोणावळा परिसरातील 3000 एकर नोंदवलेले बोगस दस्तवेज त्यांनी रद्द करायला लावले होते. राम खर्चे या एका आयएएस अधिकार्‍याचं जन्मतारखेच्या घोटाळ्याचं प्रकरण बाहेर काढलं होतं. त्यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कारही मिळाला. सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी तळेगाव बंद पाळण्यात आला आहे.

close