‘बाळगंगा’ प्रकरणी अजित पवार गणोशोत्सवानंतर चौकशीला हजर

September 22, 2015 4:53 PM0 commentsViews:

ajit pawar ncpe22 सप्टेंबर : बाळगंगा सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गणोशोत्सव संपल्यानंतर ठाणे एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

आज अजित पवारांच्या वतीने ऍड. वाय. एन मालनकर हे ठाणे एसीबी कार्यालयात हजर झाले. एसीबीने पवारांना पाठवलेली प्रश्नावलीही त्यांनी ठाणे कार्यालयात सुपूर्द केली.

बाळगंगा सिंचन घोटाळ्यात अजित पवार हजर राहणार की नाही याबाबत काहीशी अनिश्चितता होती. पण आज स्वतः त्यांच्या वकिलानेच आम्ही चौकशीला सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close