मनसेच्या फेसबुक पेजवर उद्धव ठाकरेंचे फोटो !

September 22, 2015 5:00 PM0 commentsViews:

mns_fb_page22 सप्टेंबर   मनसेच्या फेसबुक पेज आणि ट्विटर हँन्डलवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही जुने फोटो टाकण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जवळीक वाढतेय का अशी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे यांचे काही दुर्मिळ फोटो ‘मनसे अधिकृत’च्या हाती लागले आहेत. काही दशकांपूर्वी राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे कसे दिसायचे याची उत्सकता तुम्हा सगळ्यांना असेल.त्यामुळे हे फोटो देत आहोत अशा ओळी या फोटो खाली देण्यात आल्या आहेत. तर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँन्डलवर ही फोटो टाकण्यात आले असून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेलाही टॅग करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीपासून दोन्ही पक्षांची जवळीक वाढली होती. पुढच्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे फोटो टाकले असावेत का अशीही चर्चा आहे. ही मनसेनं दिलेली टाळी आहे का असाही आता प्रश्न विचारला जातोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close