आस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना शिवसेनाप्रमुखांनी दिला इशारा

January 13, 2010 10:45 AM0 commentsViews: 5

13 जानेवारी भारतीयांवर ऑस्ट्रेलियात होणारे जीवघेणे हल्ले थांबले नाहीत, तर ऑस्ट्रेलियन टीमला मुंबईसह महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी हा इशारा दिला आहे. भारतातआस्ट्रेलिया संघावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. भारतीयांवर ऑस्ट्रेलियात हल्ले होत आहेत. त्यांना जाळून मारलं जातंय, असं असताना भारताचे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी खेळाडूपणा दाखवत आहेत. हे लाजिरवाणं असल्याचंही शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्स लँड युनिव्हर्सिटीचा पुरस्कार नाकारणार्‍या अमिताभ बच्चन यांचं सेनाप्रमुखांनी कौतूक केलं आहे.

close