सनातनवर बंदीचे राज्य सरकारने पुरावेच दिले नव्हते, आर.के.सिंहांचा खुलासा

September 22, 2015 6:54 PM0 commentsViews:

r k singh_sot322 सप्टेंबर : सनातन वरच्या बंदीच्या प्रस्तावासोबत तत्कालीन राज्य सरकारनं योग्य पुरावेच दिले नव्हते असं माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी स्पष्ट केलंय.

कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक केल्यानंतर सनातनवर बंदी मागणी जोर धरू लागलीये. पण या अगोदरही आघाडी सरकारच्या काळात सनातनवर बंदीबाबत पावलं उचलली गेली होती.पण केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळे बंदी घालता आली नाही. राष्ट्रवादी तत्कालीन गृहसचिव आर.के.सिंह यांनाच आरोपीच्या कटघर्‍यात उभं केलंय. आर.के. सिंह हे सध्या भाजपचे खासदार आहेत. आर.के.सिंह हे जेव्हा गृहसचिव होते, तेव्हा राज्यात आणि केंद्रात आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी राज्य सरकारने सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पण आर.के.सिंह यांच्यामुळेच तो प्रस्ताव फेटाळला गेला असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केला जातोय. यावर आता आर.के.सिंह यांनी स्पष्टीकरण दिलंय. पी.चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री असताना हा प्रस्ताव आला होता, मात्र योग्य पुरावे द्या तरच बंदी घालता येईल असं पत्र चिदंबरम यांनी राज्य सरकारला पाठवलं होतं. त्यानंतरही पुरावे देण्यात आले नाहीत असं गेले नाहीत असं आर.के.सिंह यांचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close