बाबासाहेबांच्या स्मारकाचं 4 ऑक्टोबरला भूमिपूजन

September 22, 2015 7:11 PM0 commentsViews:

indu milll322 सप्टेंबर : इंदू मिलमध्ये प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं 4 ऑक्टोबरला भूमिपूजन होणार आहे. मंुबईत इंदू मिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे.

या स्मारकाच्या आरा़खड्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी सादर केलेला स्मारकाच्या आरखड्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.

या स्मारकासाठी एकूण 450 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी स्मारकासाठी एका वर्षासाठी 125 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहिसर ते डीएन नगर मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार आहे. तसंच दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मार्गाचंही भूमिपूजन होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close