मुंबई नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी पोलीस ढिम्मच, कंत्राटदारांवर कारवाईच नाही !

September 22, 2015 7:37 PM0 commentsViews:

mumbai rain 20 june 15 (10)22 सप्टेंबर : मुंबई नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी मुंबई पालिकेनं 3 जणांना निलंबित केलंय. पण कंत्राटदारावर अजूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस या कंत्राटदारांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

पावसाळ्यात मुंबईत महानगरपालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं. पण, या घोळाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने 7 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 3 कंत्राटदार, 3 वजनकाटा करणारे आणि 1 नोंदी घेणारा अशा लोकांचा समावेश होता. पण अद्याप यापैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेने केलेल्या तक्रारीवर कारवाई का केली जात नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे महापालिकेने आपल्या काही अभियंत्याचं निलंबन करुन, विभागीय चौकशी सुरू केलीय. महापालिकेनं मुख्य अभियंत्यासह, 6 उप अभियंते,4 सहाय्यक अभियंते, 3 मुकादम यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केलेलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close