मंडळ भारी, दुष्काळग्रस्तांना दिला 20 लाखांचा निधी

September 22, 2015 7:47 PM0 commentsViews:

22 सप्टेंबर :  राज्यात दुष्काळग्रस्त,आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदत देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांची प्रेरणा घेवून परभणीच्या पाथरीमध्ये गणेश महासंघाची स्थापना करण्यात आली. यातून पाथरीत एक शहर एक गणपती व तालुक्यात एक गाव एक गणपती ची संकल्पना राबविण्यात आली असून तब्बल 20 लाखांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी तालुक्यातील 13 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे.

parbhani bappaविशेष म्हणजे या गणेश महासंघाच्या अध्यक्षपदी मुस्लीम आमदार बाबाजानी दुर्रानी आहेत. परभणी च्या पाथरी तालुक्यात दुष्काळाने हैराण झालेल्या 13 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना काही तरी मदत करायची या दृष्टीने गणेशोत्सवात 55 गणेश मंडळांनी एकत्र येवून गणेश महासंघाची स्थापना केली.

कुठलाही अनावश्यक खर्च न करता शहरात एकच गणपती व तालुक्यातील 55 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून यातून तब्बल 20 लाख रुपये जमा केले. हा निधी नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे,विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते 13 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना 15 लाख व नाम संस्थेला 5 लाख देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महासंघाचे अध्यक्ष हे मुस्लीम आमदार बाबाजानी दुर्रानी हे असून मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम एकत्र येवून हा गणेशोत्सव पाथरीत साजरा करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close