पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता

January 13, 2010 11:13 AM0 commentsViews: 3

13 जानेवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किंमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याबाबत पंतप्रधानांबरोबर एक बैठक सुरू आहे. पंतप्रधानांनी मान्यता दिल्यास पेट्रोलचे दर लीटरमागे तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्यात ही बैठक होत आहे. यात डिझेलखरेदीवर दिलं जाणारं अनुदानही कमी करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यामुळे डिझेलचे दरही वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आपल्याकडे आढावा घेणं गरजेचं असल्याचं मत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी व्यक्त केलं आहे.

close