महानगरपालिकेनं पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत – अजित पवार

January 13, 2010 11:14 AM0 commentsViews: 43

13 जानेवारी महानगरपालिकेने पाणी गळतीवर नियंत्रण मिळवावं या शब्दात अजित पवार यांनी मुंबई महानगरपालिकेला सुनावलं आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरातल्या प्रत्येक झोनमध्ये रोटेशन पद्धतीने एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सध्या तरी हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. मुंबईसाठी राखीव साठ्यातून पाणी दिलं जाईल असं आश्वासन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. मुंबईत दिवसेंदिवस पाणीटंचाईचं संकट गंभीर होतं चाललं आहे.

close