शाहरुख होणार ‘आरे’चा ब्रॅन्ड ऍम्बेसिडर

January 13, 2010 1:07 PM0 commentsViews: 3

13 जानेवारी 'आरे'चा ब्रँन्ड अँम्बेसेडर म्हणून काम करण्याची तयारी शाहरुख खानने दाखवली आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. आरे दुध डेअरी मधली जुनी यंत्रणा काढून त्या जागी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचारही करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत आरे दुधाची विक्री इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे. मुंबई हे सगळ्यात मोठं मार्केट असतानाही अशी परिस्थिती असल्यामुळे आता मार्केटींग स्ट्रेटजी बदलण्याचा निर्णय दुग्धविकास मंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.

close