पंतप्रधान आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौर्‍यासाठी रवाना

September 23, 2015 7:59 AM0 commentsViews:

MODI IN USA

23 सप्टेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आयर्लंड आणि अमेरिका दौर्‍यावर आहेत. 23 ते 28 सप्टेंबरपर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 मिनीटांनी मोदी डबलिनला पोहचतील, तिकडे ते पंतप्रधान एंडा केनींची भेट घेणार आहेत.

मोदी संध्याकाळी साडे सात वाजल्याच्या दरम्यान भारतीय समूदायाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा हा गेल्या 60 वर्षातला भारतीय पंतप्रधानांचा पहिलाचं दौरा असणार आहे. आजच्या दौर्‍यादरम्यान अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या होण्याची शक्यता आहे. ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्गने मोदींना सिलिकॉन व्हॅली इथल्या फेसबुकच्या मुख्यालयातील टाऊनहॉलमधील चर्चासत्रात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे मोदी तिथेही उपस्थित असणार आहेत.28 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. त्यानंतर ते संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close