डोंबिवलीत एका मद्यधुंद ड्रायव्हरनं मायलेकींना चिरडलं

September 23, 2015 1:52 PM0 commentsViews:

car driveing

23 सप्टेंबर : डोंबिवलीमध्ये एका दारुड्याने नशेत गाडी चालवून फुटपाथ वर झोपलेल्या मायलेकींना चिरडल्याने या दोघींचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमाराला गिरनार चौकात हा अपघात घडला. याप्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आलीये. त्याच्या विरोधात पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इक्बाल शेख असं अटक केलेल्या गाडी चालकाचं नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेख हा मद्यधुंद अवस्थेत इनोव्हा गाडीतून भरधाव जात होता. शिवमंदिर परिसरात गिरनार चौकात समोरून आलेल्या स्कोडा मोटारीला त्याच्या इनोव्हाची धडक बसली. त्यानंतर इनोव्हा थेट फूटपाथावर चढली आणि तिथे झोपलेल्या एका महिलेसह तिच्या मुलीला चिरडले. त्यात या मायलेकींचा जागीच करूण अंत झाला. तर या अपघातात स्कोडाचा चालक जखमी झाला. त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close