समीरच्या बचावासाठी 25 वकीलांचा ताफा

September 23, 2015 2:57 PM0 commentsViews:

pansare_case_sameer_gaikwad

23 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडची कोठडी आज संपणार असून थोड्या वेळापूर्वीच समीरला कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. समीरसाठी तब्बल 25 वकिलांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कलबुर्गी हत्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी समीर गायकवाडची कोठडीची मागणी केली असून याप्रकरणी न्यायालय आज निर्णय देणार आहे.

समीरच्या बचाव करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह ठाण्यातून वकिलांची नेमणूक केली असून अशा 25 वकिलांची निवड करण्यात आली आहे. तसंच समीरची चौकशी करण्यासाठी गुजरातहून फॉरेन्सिक टीम कोल्हापुरात आज दाखल झाली आहे. समीरच्या मानसिक स्थितीची तपासणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे समीरची पोलीस कोठडी वाढवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरेंची सून स्मिता पानसरेही कोर्टात सुनावणीला हजर आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close