रणजीची मुंबईला संक्रांत भेट : कर्नाटकवर 6 रन्सनी विजय

January 14, 2010 9:25 AM0 commentsViews: 1

14 जानेवारी रणजी फायनलच्या रंगतदार मॅचमध्ये मुंबईने कर्नाटकवर 6 रन्सनी विजय मिळवला आहे. अजित आगरकर हा या विजयाचा हिरो ठरला. मुंबईने मॅचचा चौथा दिवस चांगलाच गाजवला. कर्नाटकच्या मनिष पांडेची सेंच्युरी आणि सतीशबरोबर त्याने केलेल्या डबल सेंच्युरी पार्टनरशिपमुळे मॅचमध्ये रंगत निर्माण झाली होती. या दोघांनी लंचपूर्वीच्या सेशनमध्ये फटकेबाजी करत मुंबईच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. पण इक्बाल अब्दुल्लाने पांडेला आऊट केलं. आणि मुंबईला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर मुंबईने लागोपाठ तीन विकेट मिळवल्या. पण तळाच्या बॅट्समननी चांगलीच झुंज दिली. आणि मॅच शेवटपर्यंत रंगली. पण अखेर मुंबईने 6 रन्सनी विजय खेचून आणला. अजित आगरकरने पाच विकेट घेत मुंबईच्या विजयात मोलाची कामगिरी केली.

close