रत्नागिरीतल्या शेतकर्‍यांची काळी संक्रांत

January 14, 2010 9:34 AM0 commentsViews: 7

14 जानेवारीरत्नागिरीतल्या माडबन, करेल, मिठगव्हाणे, निवेली गावातले शेतकरी काळी संक्रांत साजरी करत आहेत. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. या शेतकर्‍यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे फडकवून सरकारचा निषेध केला आहे. 'नको अणुउर्जा' असं लिहिलेले हे काळे झेंडे जैतापूर पंचक्रोषीतल्या सहा गावांमध्ये तसंच राजापूर शहराच्या मध्यवर्ती चौकातही लावण्यात आले आहेत. हे झेंडे घरांवर असेच फडकवत ठेवण्याचा निर्णय इथल्या शेतकर्‍यांनी घेतला आहे. 'सरकार आमच्या जमिनी जबरदस्तीनं घेतंय. पण अणुउर्जा प्रकल्प उभारण्याआधी सरकारने आम्हाला पहिल्यांदा गोळ्या घालाव्यात आणि मग खुशाल प्रकल्प आणावा' असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे.

close