सचिनच्या पाणी बचत मोहिमेला शिवसेना नगरसेवकांचा विरोध

January 14, 2010 9:35 AM0 commentsViews: 16

14 जानेवारी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी बचतीच्या शॉर्ट फिल्ममध्ये सचिनच्या सहभागावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी हा आक्षेप घेतला. या शॉर्टफिल्ममध्ये क्रिकेटर किंवा सेलिब्रिटींना सहभागी करण्यापेक्षा कॉमन मॅन असायला हवा असा प्रभू यांचा आक्षेप आहे. मुंबईतली पाणी टंचाई पाहता खुद्द सचिनने 'पाणी वाचवा' आवाहन करून दोनच दिवस झाले नाहीत तोच शिवसेनेने याला विरोध करायला सुरुवात केली आहे.

close