वसईमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या

September 23, 2015 7:19 PM0 commentsViews:

 
vasai23 सप्टेंबर : वसईतल्या वालिव गौराईपाडामध्ये एका 45 वर्षांच्या विवाहित महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची घटना
घडलीय. बलात्कारानंतर त्या महिलेला बेशुद्ध अवस्थेत असताना नाल्यात फेकून देण्यात आलं होतं. दोन दिवसानंतर त्या महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह फादरवाडी परिसरात सापडला. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

चित्रात दिसणारे हेच आहेत नराधम. या चार जणांनी एका विवाहित पंचेचाळीस वर्षी महिलेवर तीच्या राहत्या घराच्या बाजुच्या रुममध्ये नेवुन तीच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर महिला बेशुद्धा झाल्याच्या नंतर तीला बाजुच्या एका नाल्यात फ़ेकुन दिले होते. त्या विवाहितेचा आज वसईतील फ़ादरवाडी या परिसरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे.

बलात्कार पीडित महिला आणि तीचा पती नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करत होते. रविवारी भाजीपाला विकून रात्री बाराच्या सुमारास नालासोपारा पुर्वेकडील गौराईपाडा येथील आपल्या घरी आले होते. घरात जेवण करित असतांना साडे बाराच्या सुमारास चार वासनांध नराधमांनी घरात घुसुन प्रथम तीच्या पतीला मारहाण केली. मारहाणीत पती बेशुद्ध झाल्या नंतर त्याच्या पंचेचाळीस वर्षीच्या पत्नीला बाजुच्याच रुममध्ये नेऊन चार जणांनी बलात्कार केला. सोमवारच्या पहाटे चारच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत त्या पीडित महिलेला नाल्यात टाकुन आरोपी फ़रार झाले होते.

पतीने वालिव पोलीस ठाण्यात आज दुपारी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन महिलेचा शोध घेतला असता आज गौराई पाडा परिसरातील बाजुच्या नाल्यात फ़ेकुन दिले होते. पीडित महिलेच्या पतीने शोधाशोध केली पण पत्नी मिळत नसल्याने आज वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वालिव पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या जवानाच्या मदतीने फ़ेकलेल्या नाल्याचा शोध घेतला असता. सायंकाळी सहाच्या सुमारास वसईतील फ़ादरवाडी परिसरात महिलेचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी चारही नराधमांना अटक करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close