…तर सनातनवर बंदी घालण्यास सरकार कचरणार नाही -मुख्यमंत्री

September 23, 2015 7:45 PM0 commentsViews:

cm devendra fadanvis423 सप्टेंबर : सनातनवर बंदी घालण्याबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय. राजकीय दबावाखाली सनातवर बंदीचा निर्णय होणार नाही, ठोस पुरावे हाती लागले तर बंदी घालण्यास सरकार कचरणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला ताब्यात घेण्यात आलं. सनातनच्या साधकाला ताब्यात घेतल्यामुळे पानसरेंच्या हत्येमागे सनातन संस्थेचा हात असल्याचा संशय बळावलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी केलीये. सनातनविरोधात आघाडी सरकारच्या काळात प्रस्तावही सादर करण्यात आला होता. पण, समीर गायकवाडच्या अटकेवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजकीय दबावाखाली सनातवर बंदीचा निर्णय होणार नाही, ठोस पुरावे हाती लागले तर बंदी घालण्यास सरकार कचरणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विरोधी पक्षानं सनातनवर बंदीची मागणी केली होती. तर राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनं बंदीला विरोध केला. त्यामुळं बंदीचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close