गंगासागर इथे चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू

January 14, 2010 9:37 AM0 commentsViews: 107

14 जानेवारी पश्चिम बंगालमधल्या गंगासागर इथे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जमलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली आहे. जेट्टी नंबर तीनवर कठडा तुटल्याने भाविकांमध्ये प्रचंड गोंधळ उडून हा अपघात झाला. इथे गर्दीला आवरण्यासाठी पोलीस नसल्याने गोंधळात अधिकच भर पडली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close