हरिद्वारमधल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात

January 14, 2010 9:39 AM0 commentsViews: 1

14 जानेवारी हरिद्वारमध्ये गुरुवारपासून महाकुंभमेळा सुरु झाला आहे. या महाकुंभमेळ्याला दोन दिवसांत देश-विदेशातून सुमारे एककोटीहून अधिक भाविक हरिद्वारला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी सोळा हजारांहून अधिक सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हा महाकुंभमेळा चौदा एप्रिलपर्यंत चालणार आहे. भारतात दर चार वर्षांनी महाकुंभमेळा भरतो. अलाहाबाद, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या ठिकाणी हा महाकुंभ भरतो. हिंदू धर्मानुसार या मेळ्यात स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते. महाकुंभमेळ्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्व असल्याने याचं कव्हरेज करताना काही बंधनं पाळाव्यात असं, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून दिलेल्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.

close