बिहारमध्ये लष्कर भरतीसाठी गेलेल्या मराठवाड्यातल्या दोन तरुणांना मारहाण

January 14, 2010 10:34 AM0 commentsViews: 2

14 जानेवारी मराठवाड्यातून बिहारमधल्या गया इथे लष्कराच्या भरतीसाठी गेलेल्या दोघांना बिहारी तरुणांनी बेदम मारहाण केली. लष्कराच्या जवानांनीच या दोघांची सुटका केली. नामदेव मल्हारी तरकसे आणि त्यांचा मुलगा आनंद 10 तारखेला अंबाजोगाई तालुक्यातील धावंडी इथून लष्कराच्या भरतीसाठी गया इथे गेले होते. मंुबई हावडा एक्सप्रेसमध्ये प्रवास करतानाच त्यांना बिहारी तरुणांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. गया इथून परतताना या बिहारी तरुणांनी त्यांना पुन्हा गाठलं आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर अलहाबादपर्यंत या तरुणांचा पाठलाग करण्यात आला. एएससी बटालीयनच्या लष्करी जवानांनीच त्यांची सुटका केली. आता ते महाराष्ट्र सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत.

close