मराठा महासंघ आणि महेश मांजरेकर यांच्यात समझोता

January 14, 2010 11:36 AM0 commentsViews: 35

14 जानेवारी 'शिक्षणाच्या आईचा घो' या सिनेमावरून सुरू असलेला मराठा महासंघ आणि महेश मांजरेकर यांच्यातला वाद आता मिटला आहे. दोघांमध्ये समझोता झाल्याने हा सिनेमा आता वेळेवर रिलीज होणार आहे. मराठा महासंघाला या सिनेमाचा विशेष शो दाखवण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदत मांजरेकर यांनी वाद मिटल्याचं सांगितलं. सिनेमाच्या नावामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसंच सिनेमाच्या सुरुवातीला खुलासा म्हणजेच डिस्क्लेमर देण्यात येईल असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलं.

close