प्रदीप शर्माला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

January 14, 2010 11:57 AM0 commentsViews: 4

14 जानेवारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 2006 सालच्या लख्खन भय्या एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा याच्यासह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यात पोलीस कॉन्स्टेबल तानाजी देसाई, रत्नाकर कांबळे, नितेश सोलंकी, शैलेंद्र पांडे आणि अखिल यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अटकेनंतर प्रदीप शर्माला अंधेरी कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी संपली आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

close