सतीश शेट्टी यांच्या हत्येची हायकोर्टाने कडून गंभीर दखल

January 14, 2010 12:37 PM0 commentsViews: 1

14 जानेवारीपुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. तळेगाव-दाभाडे इथं बुधवारी शेट्टींवर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येचा काय तपास केला, त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. एका आठवड्याच्या आत ही माहिती सादर करा, असे निर्देशही हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

close