शिवराज पाटील यांची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता

January 15, 2010 11:34 AM0 commentsViews: 7

15 जानेवारी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रीपद गेल्यानंतर राजकीय विजनवासात गेलेल्या शिवराज पाटील-चाकूरकर यांचं पुनर्वसन होणार आहे. याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. राज्यपालपदाच्या 6 जागा रिक्त आहेत. त्यात शिवराज पाटील यांच्यासह मोहसीना किडवई, के. के. तिवारी, सी. के. जाफर शरीफ यांच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांचीही पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व नावांची यादी राष्ट्रपती भवनात गेल्याचं समजतं. मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटील यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं होतं. सध्या राज्यसभेचे खासदार वगळता त्यांच्याकडे इतर कोणतंही महत्त्वाचं पद नाही. त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांना महाराष्ट्र, राजस्थान किंवा पंजाब यासारख्या एखाद्या मोठ्या राज्याचं राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे.

close