बंगल्यात डेंगीच्या अळया; सेलिब्रिटींना महापालिकेची नोटीस

September 24, 2015 1:39 PM0 commentsViews:

×Ûú¦ü¸üÖêÖÝÖ¸üß

24 सप्टेंबर : जुहू आणि मलबार हिल या उच्चभ्रू परिसरातील अनेक सेलिब्रिटींच्या अलिशान बंगल्यांमध्ये डेंगीची उत्पत्ती स्थळं आढळून आल्याने महापालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली.

मुंबईतील डेंगीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जहू, मलबार हिल परिसरातील अलिशान बंगल्यांमध्ये डेंगीच्या शोधासाठी मोहिम राबवण्यात आली होती. त्यात अभिनेते जितेंद्र, अनिल कपूर, अभिनेत्री जुही चावला आणि गायक अमितकुमार यांच्या बंगल्यात डेंगीच्या आळय़ा आढळून आल्या. त्यानंतर महापालिकेच्या किटकनाशक विभागाने या सेलिब्रेटींना नोटीस बजावली. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवसास्थान, महापौर बंगला तसंच अमिताभ बच्चन, रणजीत, संजय खान, शिल्पा शेट्टी यांच्या बंगल्यातही डेंगी शोध मोहिम राबवण्यात आली. मात्र, या ठिकाणी डेंगीचे उत्पत्ती स्थान आढळून आले नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

बीएमसीनं या अभिनेत्यांना त्यासंदर्भातली नोटीसही दिली आहे. तसंच, तातडीनं या जागा स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आलीये. पाण्याच्या टाक्या आणि फुलांच्या कुंड्यांमध्ये असलेल्या पाण्यात डेंग्युचे डास तयार होतात अशी माहिती मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे 2012 मध्ये डेंग्यूमुळेच प्रसिद्ध दिग्दर्शनक यश चोप्रा यांचा मृत्यू झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close