शिर्डीत साईसमाधिला तुळशीच अच्छादन

January 15, 2010 11:40 AM0 commentsViews: 2

15 जानेवारीशिर्डीच्या साईसमाधीला ग्रहण काळात तुळशी आणि दुर्वांचं अच्छादन क रण्यात आलं होतं. यावेळी मंदिरांचे पुजार्‍यांनी साईबाबांच्या समाधीसमोर मंत्रपठण केलं. ग्रहणकाळात देवदेवतांना पाण्यात ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाबांच्या समाधीवर अभिषेक पात्राने सतत जलधारा सोडून अभिषेक केला गेला. ग्रहणकाळात साईभक्तांना मंदिराचे दरवाजे बंद असतात. पण यावेळी शिर्डी संस्थानाने दर्शन रांगा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रहण काळातही भक्तांना समाधीचं दर्शन घेता आलं.

close