साहित्य संमेलनासाठी पुणेकरांना देणगीचं आवाहन

January 15, 2010 11:43 AM0 commentsViews:

15 जानेवारीपुण्यात होणार्‍या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. संमेलन सामान्य पुणेकरांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातायत. स्वागत समितीने यावेळी अनोखा उपक्रम राबवलाय. पुणेकरांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वागत समितीने संमेलनासाठी किमान 10 रुपयांचं योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. यातून या संमेलनात आपला सहभाग असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागेल असं मत समितीने व्यक्त केलं आहे. या उपक्रमाची सुरुवात बँक ऑफ महाराष्ट्रच्या हेड ऑफिसातून झाली. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी आपला 10 रुपयांचा वाटा देऊन या उपक्रमाची सुरुवात केली. तर सुरेश पिंगळे यांनी 10 हजारांचा चेक देत साहित्य संमेलनातला वाटा उचलला. शहरातील विविध बँकाच्या सुमारे 1 हजार शाखांमधून योगदानपेट्या फिरवून पुणेकरांना साहित्य संमेलनात सहभागी करून घेतलं जाणार आहे.

close