अवैध टोल वसूली करणार्‍या 6 कर्मचार्‍यांसह एक अधिकारी निलंबित

January 15, 2010 11:47 AM0 commentsViews: 5

15 जानेवारीIBN-लोकमतच्या दणक्यानंतर उरण जवळील जासई आणि जेएनपीटीजवळचा करळ फाटा इथे अवैध टोलवसुली प्रकारात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसह एका अधिकार्‍यालाही निलंबित करण्यात आलं आहे. तर तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची नवी मुंबई कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाची नवी मुंबईतली ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे. बेकायदेशीर वसूली करुन वाहनचालकांना लुटणार्‍या पोलिसांना यामुळे चांगलाच वचक बसला आहे.

close