सतीश शेट्टी हत्याप्रकरणी आणखी 5 संशयित ताब्यात

January 15, 2010 1:23 PM0 commentsViews: 6

15 जानेवारी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी आणखी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यावर बुधवारी तलवारीने हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सतीश शेट्टी यांनी पुणे परिसरातली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती. त्यामुळेच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राज्यभरातून सामाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येचा निषेध केला होता. मुख्यमंत्र्यांनीही सतीश शेट्टी यांची हत्या ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. मुंबई हायकोर्टानेही या हत्येप्रकरणाची माहिती सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

close