सतीश शेट्टी यांच्या तीन मारेकर्‍यांना अटक

January 16, 2010 10:06 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या तीन मारेकर्‍यांना शुक्रवारी रात्री उशिरा पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ऍड. विजय दाभाडे यांच्यासह प्रमोद वाघमोरे आणि परशुराम तेलगू उर्फ चक्कल यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना शनिवारी दुपारी वडगाव-मावळ कोर्टात हजर केलं जाणार आहे. विजय दाभाडेंच्या अनधिकृत बांधकामांचा सतीश शेट्टी यांनी पर्दाफाश केला होता. सतीश शेट्टी यांना मारहाण केल्याबद्दल यापूर्वीही दाभाडे आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. शेट्टींबरोबर असणार्‍या वादातूनच दाभाडे यांनी शेट्टींच्या खुनाची सुपारी दिली होती.

close