शिवसेनेचं इचलकरंजी-यवतमाळ बंद आंदोलन

January 16, 2010 10:13 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी शिवसेना उपशहरप्रमुख संतोष बाबर यांच्या हत्येचा निषेध म्हणून शिवसेनेनं इचलकरंजी बंदंच आवाहन केलं आहे. शुक्रवारी बाबर यांच्या डोक्यात तलवारीचे वार करून खून करण्यात आला होता. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं हा बंद पुकारला आहे. ही हत्या नक्की कुठल्या वादातून झाली याचा तपास चालू आहे. तर होर्डीगला काळं फासल्याने यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी 2 बस 2 ट्रक आणि पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली. काळं फासल्याचा निषेध म्हणून शिवसेनेने यवतमाळ बंदचं आवाहन केलं आहे.

close