हजयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत 14 भारतीयांचा मृत्यू

September 25, 2015 1:29 PM0 commentsViews:

HAJJ!

25 सप्टेंबर : सौदी अरेबियातील हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 14 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झालेत. परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तसंच जखमी असलेल्या 13 भारतीयांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही स्वराज यांनी ट्विट करून दिलीये.

हज यात्रेतल्या 14 मृतांपैकी 9 गुजरात, झारखंड आणि तामिळनाडूचे प्रत्येकी 2 आणि महाराष्ट्रातील एकाचा सवामेश आहे. तसंच जखमी झालेल्यांमध्ये 13 जण भारतीय असून, जम्मू काश्मीर आणि प. बंगालचे प्रत्येकी 2, लक्षद्वीप, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, बिहार, ओडीसा, केरळ आणि यूपी येथील प्रत्येकी 1 भाविकाचा समावेश आहे. दरम्यान, यात्रेकरूंना संपर्क करण्यासाठी आपातकालीन नंबर 00966125458000 व 00966125496000 तर, 8002477786 असा टोल फ्री नंबर देखील स्वराज यांनी ट्विट करून सांगितलं आहेत.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close