महाराष्ट्राच्या राज्यपालपदी के. शंकरनारायणन

January 16, 2010 10:24 AM0 commentsViews: 11

16 जानेवारी महाराष्ट्रासह 7 राज्यांसाठी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी के. शंकरनारायणन यांची निवड करण्यात आली आहे. तर सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांची प.बंगालच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्याकडे पंजाबच्या राज्यपालपदाची जबाबदारी देऊन त्यांचं पुर्नवसन करण्यात आलं आहे. छत्तीसगडचे राज्यपाल ई.एस. एल. नरसिंह यांच्याकडे आंध्रप्रदेशचं राज्यपालपद देण्यात आलं आहे. एन. डी. तिवारींच्या राजीनाम्यानंतर नरसिंह हे आंध्रप्रदेशचे प्रभारी राज्यपाल होते. छत्तीसगडच्या राज्यपालपदी नरसिंह यांच्या जागी माजी संरक्षण सचिव शेखर दत्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल प्रभा राव यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपालपदाची सुत्रं देण्यात आली आहेत. तर उर्मिलाबेन पटेल या प्रभा राव यांची जागा घेणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या त्या पत्नी आहेत.

close