भाजपसोबत स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात उतरू नका – माणिकराव ठाकरे

January 16, 2010 1:03 PM0 commentsViews: 2

16 जानेवारी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपच्या सोबत आंदोलन करून नका, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विदर्भातल्या नेत्यांना दिला आहे. आपली मतं मांडायची असतील तर ती पक्षाच्या व्यासपीठावरच मांडा, भाजपच्या व्यासपीठावर नको. असंही माणिकरावांनी काँग्रेसच्या नेत्यांना बजावलं आहे. वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेसची भूमिका ठरलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 20 तारखेला विदर्भीय नेत्यांनी विदर्भ बंदच आवाहन केलं आहे.

close