मरणानेही छळले, 12 मृतदेह डंपिंग ग्राऊंडमध्ये गाडले !

September 25, 2015 7:12 PM0 commentsViews:

panvel damping_body25 सप्टेंबर : ‘जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका…’पण इथं मरणानंतरही सुटका झाली नाही. पनवेलमध्ये 12 बेवारस मृतादेहांची विल्हेवाट चक्क डंपिंग ग्राऊंडमध्ये करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

रायगड मधील पनवेल पोलीस आणि पनवेल नगरपालिकेने आपल्या हद्दीतील 12 बेवारास मृतदेहांची विलेव्हाट चक्क डंपिग ग्राउंडमध्ये केलीय. बुधवारी सकाळी एका ऍम्ब्युलन्समधून 10 पुरूषांचे आणि दोन महिलांचे मृतदेह दफन करण्यासाठी आणले. जेसीबीने खड्डा ही खणला गेला. मात्र मृतदेहांवर जेसीबी माती टाकण्यास ड्रायव्हरने विरोध केल्याने. संपूर्ण एक दिवस बाराही मृतदेह ऍम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले. आणि नंतर माणसाच्या मदतीने खड्डात जमा झालेल्या घाण पाण्यात पुरण्यात आले. यावेळी ज्यांची जबाबदारी आहे. ते पोलीस आणि पनवेल नगरपालिकेचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close