छत्तीसगडमध्ये साडेसात क्विंटलची स्फोटकं जप्त

September 25, 2015 9:14 PM0 commentsViews:

chatisgad3325 सप्टेंबर : छत्तीसगडमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. बस्तर पोलिसांनी ही कारवाई केलीय. तब्बल साडे सात क्विंटलची स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहे.

सातशेहुन जास्त बस उडवण्याची क्षमता या स्फोटकांमध्ये आहे. या स्फोटकांमध्ये तीस पेटी जिलेटीन, वीस पोती अमोनियम नायट्रेट यांचा समावेश आहे.

माओवाद्यांना ही स्फोटके पुरवणार्‍या आंतरराज्यीय टोळीलाही पोलिसांनी अटक केलीय. यात इंजिनियरसह सात जणांना समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close