सतीश शेट्टी हत्याप्रकरणी तीनही आरोपींनी पोलीस कोठडी

January 16, 2010 1:05 PM0 commentsViews: 2

16 जानेवारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींनी 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी ऍड. विजय दाभाडे यांच्यासह प्रमोद वाघमोरे आणि परशुराम तेलगू उर्फ चक्कल यांना वडगाव-मावळ कोर्टाने ही पोलीस कोठडी सुनावली आहे. सतीश शेट्टी यांची 13 जानेवारीला सकाळी तळेगाव दाभाडे इथे हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या तीन मारेकर्‍यांना शुक्रवारी रात्री उशिरा पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

close