टिळक आम्हाला माफ करा !, मंडळाने नाचवल्या बारबाला

September 25, 2015 11:56 PM2 commentsViews:

25 सप्टेंबर : लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आताच्या गणेशभक्तांनी कुठे नेवून ठेवलाय याच ज्वलंत उदहारण वसईत आणि भाईंदर येथे पाहायला मिळालं. वसई पश्चिमेकडील फेरिवाला सार्वजनिक गणेश मंडळात चक्क नंगा नाच सुरू होता. तर मीरा भाईंदर इथल्या दुध फळ विक्रेता मंडळानं तर चक्क बारबालांनाच नाचवलं. त्यांच्यावर पैसेही उडवले.vasi viraa4334

लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी गणेश उत्सव सुरू केला. मात्र सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र काही वेगळंच दाखवतंय. वसईतल्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळानं आणि मिरा-भाईंदरच्या दुध फळ विक्रेता मंडळानं नैतिकतेच्या सर्व सिमा ओलांडल्यात. वसईच्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळानं काल सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर एका मुलीने अश्लील डान्स केला. विशेष म्हणजे इथल्या मंडळाचे लोकं त्या मुलीवर पैसे उडवत होते. तर दुसरीकडे मीरा भाईंदर इथल्या दुध फळ विक्रेता मंडळानं तर चक्क बारबालांनाच नाचवलं. त्यांच्यावर पैसेही उडवले. खरंतर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन होतं. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही. या अश्लील डान्सची क्लीप व्हॉट्सऍपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि वसईतल्या फेरीवाला सार्वजनिक गणेश मंडळाच्या 4 पदाधिकार्‍यांसहित 2 मुली आणि पैसे उडवणार्‍यांसहित 12 जणांवर माणिकपूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी भिभित्स वर्तन केल्या प्रकरणी कलम 294 प्रमाणं आणि मुंबई पोलीस कायदा 33 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि लवकरच या सर्वाना अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर दुसरीकडे या सर्व प्रकाराचा शिवसेनेनं विरोध केलाय. आणि या दोन्ही मंडळांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ketan

    he aahet parprantiya

  • वैभव कांगणे

    ashya aayojakana tar bhar chaukat phatke dile pahije

close