संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोदींनी दिला गरिबी निर्मूलनाचा नारा

September 26, 2015 9:14 AM0 commentsViews:

pm-modi-un

26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र परिषदेच्या आमसभेत भाषण केलं. भारताला कायमचे सदस्यत्व मिळवून देण्याचं लक्ष्य साधत मोदींनी सभागृह गाजवले. गरिबी हीच विकासाच्या मार्गात अडसर असल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी गरिबी निर्मूलनाची गरज असल्याचं मोदी म्हणाले. विशेष म्हणजे संपूर्ण भाषण हिंदीतून करत मोदींनी भारताच्या सातत्यपूर्ण विकासाचा अजेंडा संयुक्त राष्ट्रांत मांडला.

आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी गांधीजींनी भावी पिढ्यांबाबत व्यक्त केलेल्या मतानं केली. हवामान बदलाबाबतचं लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर भारत असल्याचा विश्वास त्यांनी जागतिक नेत्यांना दिला. जगातून गरिबी हटल्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणं अशक्य आहे. त्यामुळे गरिबी हटवण्याकडे सर्व देशांनी लक्ष दिलं पाहीजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. याचसोबत सगळ्यांसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याखेरीज शिक्षण, चांगलं आरोग्य आणि स्वच्छ वातावरण या गरजादेखील प्राथमिक गरजा बनणं गरजेचं आहे. या मुद्द्यांवर विकास साधण्यासाठी गरज पडल्यास नवीन उपाययोजना आखाव्या लागतील असंही मोदींनी स्पष्ट केलं.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जागतिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले. त्यामुळे निसर्गाच्या संरक्षणासाठी आपली भावी पिढी नव्या संकल्पनांसह मजबूत बनेल, असा दावाही पंतप्रधान मोदींनी संमेलनातील भाषणात केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close