दुसर्‍या दिवशीही निवासी डॉक्टरांचा संप, रुग्णांचे प्रचंड हाल

September 26, 2015 11:01 AM0 commentsViews:

KEM!@

26 सप्टेंबर : रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीविरोधात केईएमच्या डॉक्टरांनी आज सलग दुसर्‍या दिवशीही संप कायम ठेवला आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दरम्यान, संप मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा ग्राहक मंचानं दिला आहे.

काल डेंग्यू झालेली एक मुलगी उपचारादरम्यान कोमात गेली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत, केईएमच्या 3 निवासी डॉक्टरांना लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉ. सुहास चौधरी, डॉ. कुशल आणि डॉ. पुनीत हे तिन्ही डॉक्टर जबर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

याच्या निषेधार्थ संतप्त डॉक्टरांनी कालपासून संप पुकारला आहे. जो पर्यंत रुग्णालयातला बंदोबस्तात वाढ होतं नाही, तो पर्यंत कामावर येणार नसल्याचा पवित्रा केईएणच्या मार्डच्या डॉक्टरांनी घेतला आहे. रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तर नसतेच याशिवाय पोलीस नसतात, त्यामुळे वारंवार डॉक्टरांना मारहाण होते, ही नेहमीच मार्डची तक्रार राहिलेली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close