बांध फूटल्याने नांदूर मधमेश्वर धरण रिकामं

January 18, 2010 9:50 AM0 commentsViews: 8

18 जानेवारी नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या लगतचा मातीचा भराव असलेला बांध फुटल्यानं हजारो क्युसेक्स पाणी वाहून गेलं आहे. पाण्याचा दबाव कमी करण्यासाठी भांबावलेल्या पाटबंधारे विभागाने धरणाचे आणखी तीन दरवाजे उघडून पाण्याचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे 800 क्युसेक्स वेगानं धरणातलं पाणी वाहून जायला सुरुवात झाली. धरण जवळ जवळ रिकामं झालं आहे. धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर धरणाच्या वरील पट्‌ट्यातील गावांना आता तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची चिन्हं आहेत.

close