गिरणी कामगारांची मंत्रालयावर धडक

January 18, 2010 9:59 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी आपल्या हक्काच्या घरासाठी गिरणीकामगार मंुबईतल्या रस्त्यावर उतरले आहेत. हे कामगार मंत्रालयावर धडक देणार आहेत. गिरण्यांच्या जमिनीवर केवळ गिरणी कामगारांनाच घरं देण्याचा नियम सरकारने बनवला आहे. त्यामुळे गिरण्यांच्या चाळींमध्ये असलेल्या अनेकांना हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागणार आहे. तसंच बहुतेक गिरणी कामगारांना उपनगरांमध्ये विस्थापित करण्यावर सरकार विचार करत आहे. त्याविरोधात गिरणी कामगारांनी हा मोर्चा काढला. या मोर्चेकर्‍यांचा सध्या आझाद मैदानात मेळावा सुरू आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावरही गिरणी कामगारांनी मोर्चा काढला.

close