44 विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याची केंद्राची शिफारस

January 18, 2010 10:09 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी केंद्रसरकारने 44 डिम्ड विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याची शिफारस सुप्रिम कोर्टाकडे केली आहे. 126 डिम्ड विद्यापीठांची तपासणी केल्यानंतर केंद्राने ही शिफारस केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या या शिफारसीत महाराष्ट्रातल्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचाही समावेश आहे. 2005मध्ये याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार यूजीसीने 126 विद्यापीठांची चौकशी केली. त्यानुसार 3 वर्षे मुदत देऊनही या 44 विद्यापीठांचा कारभार सुधारला नाही. त्यामुळे यूजीसीने या विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे.

close