समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

September 26, 2015 1:45 PM1 commentViews:

sameer_gaikwad_pansarecase_arrest

26 सप्टेंबर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कॉ. पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपी गायकवाडच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करत येत्या 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, गायकवाडच्या बचावासाठी सनातनकडून 31 वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. तर पानसरे यांच्या बाजुने सुमारे 200 वकिलांनी बाजू मांडली. त्यामुळे सुनावणीसाठी जवळपास 300 वकिलांचा फौजफाटा न्यायालयात उपस्थित होता.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

  • समीरचे कॉल डिटेल्स अजूनही तपासायचे आहेत
  •  घटनेच्या दिवशी ठाण्यात हजर होतो, असे तो म्हणतो, ती बाब अजूनही तपासायची आहे
  •  सस्पेक्ट डिटेक्शन टेस्टचा रिपोर्ट अजूनही यायचा आहे
  •  समीरकडे सापडलेली 31 सिमकार्ड ज्यांच्या नावावर आहेत त्यांची चौकशी व्हायची आहे
  •  रुद्रगौडा पाटीलशी त्याचा कॉल झालेला आहे असा या तपासात आढळलं आहे
  •  या सर्व बाबींचा विचार करता 4 दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळावी.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sohan Chawre

    या प्रकरणाच्या सूत्रधार पर्यन्त पोहोचले पाहिजे !

close