फिनोलेक्स औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन

January 18, 2010 10:22 AM0 commentsViews: 11

18 जानेवारीरत्नागिरीत फिनोलेक्स कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांनी मोर्चा काढलाय. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी दगडफेक सुरु केल्यानं पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांशी झटापटही केली. फिनोलेक्स या पीव्हीसी पाईप तयार करणार्‍या कंपनीनं रत्नागिरीत 1200 मेगावॅटचा औष्णिक प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळवली आहे. या प्रकल्पाला रत्नागिरीतल्या पावस, गोळप परिसरातल्या शेतकर्‍यांनी विरोध म्हणून सोमवारी एक मोर्चा काढून त्यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांशी बोलणी करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी त्यांना कंपनीच्या गेटवरच रोखून धरलं. त्यामुळं जमाव आक्रमक झाला होता.

close