साखरेचे भाव कमी होणार – शरद पवार

January 18, 2010 10:27 AM0 commentsViews:

18 जानेवारीसाखरेचे भाव अखेर कमी करणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितलं आहे. होलसेल बाजारात साखरेचे भाव 42 रुपये किलोवरून 38 रुपये किलो करण्यात येणार आहेत. मात्र सामान्यांसाठीच्या रिटेल मार्केटमध्ये हे भाव उतरायला कमीत कमी 2 आठवडे तरी लागतील. भडकलेली महागाई आणि त्यामुळे तापणारं जनमत पाहून केंद्र सरकाराने अखेर पावलं उचलली आहेत. विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारला दोष देऊन पवारांनी साखरेचे भाव वाढल्याचं कारण दिलं होतं.

close