मुंबई महानगरपालिकेसमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

January 18, 2010 1:14 PM0 commentsViews: 2

18 जानेवारी मुंबई महानगरपालिकेसमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जी.टी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रवींद्र महाडीक हे तिचे पती महानगरपालिकेच्या के पूर्व विभागात मोटर लोडर म्हणून कामाला होते. दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. अनुकंपा तत्वावर नोकरीच्या मागणीसाठी ही महिला महानगरपालिकेत फेर्‍या मारत होती. तसंच तिला अजून पीएफचे पैसैही मिळालेले नाही. त्यामुळे वैतागून तिने शेवटी आत्मदहनाचा मार्ग निवडला. महापौरांनी या महिलेविषयी माहिती नसल्याचं सांगत प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

close