अभिनव बिंद्रा कॉमनवेल्थ आणि वर्ल्डकप शुटींगमधून बाहेर

January 18, 2010 1:16 PM0 commentsViews: 3

18 जानेवारी ऑलिम्पिक गोल्ड विजेता अभिनव बिंद्रा अखेर कॉमनवेल्थ आणि वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेत खेळू शकणार नाही. रायफल असोसिएशनने आयोजित केलेल्या नॅशनल सराव शिबिरात गैरहजर राहिल्यामुळे या स्पर्धेसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही, असं निवड समितीने म्हटलंय. कॉमनवेल्थ आणि वर्ल्डकप या दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. पण त्यात अभिनव बिंद्राच्या नावाचा समावेश नाही. अभिनव बिंद्रा आणि रायफल असोसिएशन यांच्यात गेले काही दिवस वाद सुरु होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार असल्यामुळे काही देशांतर्गत स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय बिंद्राने घेतला होता. शिवाय नॅशनल सराव शिबिरातही जायला त्याने नकार दिला होता. त्यानंतर आता बिंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे. खेळाडूची मागची कामगिरी नाही तर सध्याचा फॉर्म बघून टीम निवडण्यात आल्याचं रायफल असोसिएशनचे सचिव बलजीत सिंग सेठी यांनी सांगितलं.

close